अंजली दमानियांना धक्का; खडसेंची बदनामी भोवली

अंजली दमानियांना धक्का; खडसेंची बदनामी भोवली

एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप केल्याने भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल केलेला आहे. सदरील बदनामीचा खटला रद्द करण्यात यावा म्हणून अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर न्यायालयात अर्ज केलेला होता, त्यावर २९ सप्टेंबर रोजी फिर्यादी रमेश ढोले यांच्या बाजुने ॲड. व्ही.एच.पाटिल (जळगाव) आणि ॲड. ए.आर.कांडेलकर (मुक्ताईनगर) तर दमानियांच्या बाजूने ॲड. खैरनार यांनी युक्तिवाद केलेला होता. त्यावर आज १२ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर न्यायालयात सुनावणी झाली असता अंजली दमानिया यांचा सदरील अर्ज फेटाळण्यात आला आहे. अंजली दमानिया आणि प्रिती शर्मा मेनन हे मुक्ताईनगर न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरुध्द ३० हजार रुपयांचा बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जावयाने घेतलेली लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, बेकायदा संपत्ती, पीएचे लाच प्रकरण अशा अनेक विषयांवर अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. सदर आरोप खोटे असून आपल्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे, अशी तक्रार करत मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला गेला होता.

First Published on: October 12, 2018 9:23 PM
Exit mobile version