मुंबईत CNG-PNGच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबईत CNG-PNGच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

गेल्या अनेक दिवसांपासून मुबईसह देशभरात सातत्याने महागाई वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. अशातच पुन्हा एकदा मुंबईकरांना महागाईचा फटका बसणार आहे. त्याचे कारण म्हणजे महानगर गॅसकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, सीएनजीच्या (CNG) दरात साडे तीन रुपये प्रति किलो वाढ केली आहे. तर, पीएनजीच्या दरात दीड रूपयांची वाढ करण्यात आली आहे. (mumbai cng png price hike from today)

महानगर गॅसने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार मुंबईत आजपासून सीएनजी आणि पीएनजीवर हे दर लागू होणार आहेत. त्यानुसार, साडे तीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या (CNG) दरात वाढ झाली आहे. तर, घरगुती पीएनजीच्या (PNG) दरात दीड रूपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) वाढ झाली आहे. गेल्या महिन्यांत एमजीएलने सीएनजी आणि पीएनजी दरात आतापर्यंत अनेकदा वाढ केलेली आहे.

मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर 89.50 प्रति किलो तर घरगुती पीएनजी दर 54 रुपये प्रति एससीएम असे जाहीर करण्यात आले आहेत. या वाढत्या दरांमुळे सीएनजीसाठी मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरे आणि माझ्यामुळेच शिवसेनेत फूट पडली, आदित्य ठाकरेंचा धक्कादायक खुलासा

First Published on: November 5, 2022 7:37 AM
Exit mobile version