घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे आणि माझ्यामुळेच शिवसेनेत फूट पडली, आदित्य ठाकरेंचा धक्कादायक खुलासा

उद्धव ठाकरे आणि माझ्यामुळेच शिवसेनेत फूट पडली, आदित्य ठाकरेंचा धक्कादायक खुलासा

Subscribe

भाजपाने शिवसेनेला साथ दिली असती तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपा आणि शिवसेनेत करार झाला होता. युतीचं सरकार स्थापन झाल्यास अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं. त्यानुसार, आता अडीच वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री असते. पण त्यांना ते मंजूर नव्हतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. उद्धव ठाकरेंनी नेत्यांना पुरेसा वेळ न दिल्याने ४०आमदारांनी शिवसेना सोडली असा आरोप करण्यात आला होता. यावर आदित्य ठाकरेंनी मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेतील फूट उद्धव ठाकरे आणि माझ्यामुळेच पडली, असा धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. इंडिया टुडेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (My father and I to blame for Sena split, Aaditya Thackeray’s explosive claim)

हेही वाचा दिल्ली महापालिका निवडणुका जाहीर, 4 डिसेंबरला दिल्लीतील ‘छोटे सरकार’ निवडण्यासाठी मतदान, 7 ला निकाल

- Advertisement -

आमच्यामुळेच शिवसेना फुटली. बंडखोरांवर आम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला. ते आमच्यातीलच आहेत असं आम्हाला वाटत होतं. ते आमच्यासोबत कायम एकनिष्ठ राहतील असं आम्हाला वाटलं होतं. गेल्या ४०-५० वर्षात कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं दुसऱ्या नेत्याला दिलं नव्हतं. पण आम्ही दिलं, अशी खंत आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली.
आम्हाला वाटलं आम्ही त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू शकतो. पण ते आमच्या मागे असा खेळ करतील असं वाटलं नव्हतं. आम्ही आमच्या नेत्यांवर पाळत ठेवत नव्हतो. आणि इथंच आमचं चुकलं. राजकारण वाईट आहे, असं आम्हाला वाटत नव्हतं. आमचा याच विश्वासामुळे आमचा विश्वासघात झाला, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर ते बोलले की आम्ही वाईट राजकारण खेळलो नाही म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अजूनही पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही. शिवसेना आणि महाराष्ट्राला बदनाम करणं एवढाच त्यांचा उद्देश होता. पण संपूर्ण देशात अनेक बाळासाहेब आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – सुषमा अंधारेंचे ‘प्रबोधन’ करण्यासाठी मलाच जावे लागेल; तृप्ती देसाईंचा टोला

…तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते

भाजपाने शिवसेनेला साथ दिली असती तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपा आणि शिवसेनेत करार झाला होता. युतीचं सरकार स्थापन झाल्यास अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं. त्यानुसार, आता अडीच वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री असते. पण त्यांना ते मंजूर नव्हतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -