Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबधित मृतांची संख्या घटली, गेल्या २४ तासात ५६२ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबधित मृतांची संख्या घटली, गेल्या २४ तासात ५६२ कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona virus Update 3,671 new covid-19 positive patients registered in mumbai today

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे २१ रुग्ण आढळले होते. परंतु या मधील १ रुग्णाचा मृत्यू आणि उर्वरित २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे सध्या डेल्टा प्लसच्या व्हेरियंटबाबत कोणतीही भीती नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. परंतु कोरोना प्रादुर्भावाचे संकट अजूनही काय आहे. मागील २४ तासात मुंबईत ५६२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मागील २४ तासात ६२९ कोरोनाबाधित रुग्णांची कोरोनावर मात केली असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यामुळे मुंबईकरांच्या चिंता कमी आली आहे.

मुंबईत आतापर्यंत ७ लाख २१ हजार ५२३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर गेल्या २४ तासात ५६२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबई पालिकाक्षेत्रात आतापर्यंत एकूण ६ लाख ९५ हजार ४२५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या संकटात एकूण १५ हजार ४२६ कोरोनाबाधितांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. सध्या ८ हजार ३७१ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे

मुंबईतील कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत आतापर्यंत ७१ लाख ०४ हजार ७२२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत यामध्ये मागील २४ तासात ३१ हजार ७६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोना बरा होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९६ टक्क्यांवर गेला आहे. २२ जून ते २८ जून २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा गर ०.०९ टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ११ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ पुरुष व ५ रुग्ण महिला होते. ८ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित ४ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. अशी माहिती मुंबई महानगरपालिकाकडून देण्यात आली आहे.

First Published on: June 29, 2021 10:35 PM
Exit mobile version