Aryan Khan : आर्यन खानने अनन्या पांडेकडूनच घेतला गांजा, नव्या चॅटमधून खुलासा

Aryan Khan : आर्यन खानने अनन्या पांडेकडूनच घेतला गांजा, नव्या चॅटमधून खुलासा

Aryan Khan : आर्यन खानने अनन्या पांडेकडूनच घेतला गांजा, नव्या चॅटमधून एनसीबीचा खुलासा

Aryan Khan and Ananya Panday WhatsApp chats: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या तुरुंगात आहे. याच प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. मात्र या ड्रग्ज प्रकरणात आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेही एनसीबीच्या रडारवर आहे. अनन्य पांडेची एनसीबी अधिकाऱ्यांकडून आत्तापर्यंत दोन वेळा चौकशी झाली आहे. या चौकशीदरम्यान आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील नव्या चॅट एनसीबीच्या हाती लागल्या आहेत. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

आर्यनने चॅटमधून मित्रांना NCB च्या नावे घाबरवले

आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातील धक्कादायक व्हॉट्सअप चॅटचे नवे स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत. ज्यात एका ग्रुप चॅटचे स्क्रीनशॉट देखील आहे. ज्यात कोकेन ड्रग्जचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय आर्यन खानने एनसीबीच्या नावाचा उल्लेख करत मित्रांना घाबरवल्याचेही चॅटमधून उघड झाले आहे.

कोणासंबंधीत आहेत व्हॉट्सअॅप चॅट ?

या व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून आर्यन खानने अचित कुमारकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्यासंदर्भात बातचीत केली आहे. यात आर्यन खानने अचित कुमारकडून ८० हजार रुपये किमतीच्या ड्रग्जची मागणी केली आहे.

चॅटमध्ये अनन्या- आर्यनमध्ये काय चर्चा झाली?

अनन्या- आर्यनच्या समोर आलेल्या चॅट्स जुलै २०१९ मधील आहेत. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्या आणि आर्यन ड्रग्ज खरेदीवर बोलत आहेत. ज्यात आर्यनने Weed चा उल्लेख केला आहे. ज्यावर अनन्या आर्यनला म्हणते Weed ची बाजारात मोठी मागणी आहे.

यातील एका चॅटमध्ये आर्यन अनन्याकडे Weed ची मागणी करतो. तसेच मी तुझ्याकडून गुपचूप घेऊन असे सांगतो त्यावर अनन्या याला बाजारात खूप डिमांड असल्याचे सांगत ओके म्हणते.

तर दुसऱ्या एक चॅटमध्ये अनन्या मी बिझनेसमध्ये असल्याचे सांगते पण आर्यन तिच्याकडे पुन्हा Weed बाबत विचारणा करतो. ज्यावर अनन्या मला मिळेल असं उत्तर देतेय.

एनसीबीला आर्यन आणि अनन्याच्या ज्या व्हॉट्सअॅप चॅट हाती लागल्या आहेत. त्या १८ एप्रिल २०२१ च्या आहेत. यात आर्यन आपल्या मित्रांसोबत कोकेन ड्रग्जसंदर्भातही बोलत असल्याचे सांगण्यात आले. आर्यनच्या या तिसऱ्या चॅटमध्ये आर्यन मित्रांना उद्या कोकेन घेऊ असं सांगत तुमच्यासाठी मी घेऊन येतो असे म्हणाला आहे. तर शेवटी एनसीबी बाय असं मेसेज केला आहे.

एनसीबी अधिकाऱ्यांना आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून दोन इतर लोकांसोबतही ड्रग्जवर चर्चा करत असल्याचे समोर आले आहे. ज्यातून अनन्या पांडेसह तिसऱ्या सेलिब्रिटी किड्सचे नाव आता समोर आले आहे. एनसीबीने यापूर्वी देखील आर्यन खान आणि अनन्या पांडेसोबतचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते आणि त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती.


 

First Published on: October 26, 2021 3:34 PM
Exit mobile version