Mumbai Extortion Case: वाझे आणि परमबीर सिंहांनी खंडणी उकळलेल्या क्रिकेट बुकी, हॉटेल व्यावसायिकांची होणार चौकशी

Mumbai Extortion Case: वाझे आणि परमबीर सिंहांनी खंडणी उकळलेल्या क्रिकेट बुकी, हॉटेल व्यावसायिकांची होणार चौकशी

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची कस्टडी घेतली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात सचिन वाझेचा तळोजा तुरुंगातून ताब्यात घेतला. आता मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ ने अटक केलेल्या खंडणी प्रकरणाच्या गुन्हयात सचिन वाझे कडून उघड करण्यात आलेल्या क्रिकेट बुकी आणि हॉटेल व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून केवळ हॉटेल व्यावसायिकच नाही तर क्रिकेट बुकीकडून वसुली केली जात होती, असा खुलासा वाझेने गुन्हे शाखेच्या चौकशीत केला होता. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली होती. हॉटेल व्यावसायिकांसह मुंबईतील बडे बुकी देखील वसुलीच्या टार्गेटवर होते अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता क्रिकेट बुकी आणि हॉटेल व्यावसायिकांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बऱ्याच काळापासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेला गोरेगाव खंडणी प्रकरणात या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ११ कडे सोपवण्यात आला होता. वाझेचा ताबा मुंबई पोलिसांकडे देण्याकरता एनआयएच्या विशेष न्यायलयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर कारागृह वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सचिन वाझे प्रवास करू शकतात असा अहवाल सादर केल्यानंतर वाझेचा ताबा मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यासाठी संमती देण्यात आली.


हेही वाचा – ईडीने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुखांचा घेतला ताबा


 

First Published on: November 8, 2021 2:44 PM
Exit mobile version