घरमहाराष्ट्रईडीने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुखांचा घेतला ताबा

ईडीने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुखांचा घेतला ताबा

Subscribe

ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांचा आर्थर रोड तुरुंगातून ताबा घेतला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा विशेष पीएमएलए न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने रविवारी रद्द करत १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

ईडीकडून ५ वेळा समन्स आल्यानंतर अनिल देशमुख इंडीच्या कार्यालयात हजर होताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांना शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर ईडीने त्यांची कोठडी मागितली असताना पीएमएलए न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावत अनिल देशमुखांना शनिवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

- Advertisement -

दरम्यान, या निर्णयाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायालयाचा हा निर्णय रद्द ठरवत अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसांच्या ईडी कोठडीत केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

त्याची दखल घेऊन सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. ईडीने पाच वेळा समन्स बजावून देखील अनिल देशमुख आले नव्हते. अनिल देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येत होते. त्या दरम्यान ते अज्ञातवासात होते. अखेर चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर १३ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना १२.५० च्या सुमारास अटक झाली.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -