धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग

धुळीत हरवला मुंबई-गोवा महामार्ग

Exif_JPEG_420

पावसाचा जोर काही अंशी कमी होऊन ऊन पडावयास सुरुवात झाली असल्याने महामार्गावर खड्ड्यांची ठिगळे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेल्या दगडमिश्रित मातीने आपला रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे रस्ता सध्या धुरळ्यात हरवल्याचे दिसत आहे.

गेले अनेक वर्षे चौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला हा महामार्ग दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात खड्डेमय झाल्याने ठेकेदाराकडून दगडमिश्रित माती टाकून खड्डे भरण्याची मलमपट्टी करण्यात आली. आता अधून-मधून कडक ऊन पडायला लागल्याने अवजड वाहनांमुळे टाकलेल्या दगडांची पावडर होऊन त्यातून धुळीचे लोट उठत आहेत. याचा सर्वात फटका नागोठणे ते वाकण दरम्यान जा-ये करणार्‍या दुचाकीस्वारांसह पादचार्‍यांना बसत आहे. उडणारा धुरळा डोळ्यात आणि नाकात जात असल्याने श्वसनाचा, तसेच सर्दीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत गणेशोत्सवासाठी जाणार्‍या प्रवाशांच्या व पर्यायाने वाहनांच्या संख्येतसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे ठेकेदारांकडून या मार्गाचे डांबरीकरणाचे काम तातडीने हाती घेतले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

First Published on: August 21, 2019 1:56 AM
Exit mobile version