दिशा सालियानचे चारित्र्य हनन, महिला आयोगााने कारवाई करावी, महापौर पेडणेकरांचा राणेंवर पलटवार

दिशा सालियानचे चारित्र्य हनन, महिला आयोगााने कारवाई करावी, महापौर पेडणेकरांचा राणेंवर पलटवार

दिशा सालियानचे चारित्र्य हनन, महिला आयोगााने कारवाई करावी, महापौर पेडणेकरांचा राणेंवर पलटवार

दिशा सालियानचे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चारित्र्य हनन केलं असून या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. भाजपकडून महिलांचे हनन केलं जात आहे. दिशा सालियानचे पोस्टमार्टम रिपोर्ट खोट ठरवण्याचे काम केंद्रीय मंत्री नारायण राणे करत असतील तर त्यांच्या खात्याची छाप त्यांच्यावर पडल्याचे दिसत आहे. असा टोला महापौर पेडणेकर यांनी लगावला आहे. मुलीचा मृत्यू झाल्यानंतरसुद्धा तिच्यावर जे आरोप करण्यात येत आहेत त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे असा इशारा देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघात केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन याच्याबद्दल जे उद्गार काढले ते एक महापौर म्हणून व्यथित करणारे होते. कारण दिशा सालियनच्या पोस्टमार्टम रिपोर्टला खोटं ठरवण्याचे काम लघू, सूक्ष्म, मध्यम या खात्याचे केंद्रीय मंत्री जर म्हणत असतील तर मला वाटतं त्या खात्याची छाप किंवा अवमूल्यन होताना दिसतेय असा टोला महापौर पेडणेकरांनी नारायण राणेंना लगावला आहे.

महिला आयोगाने कारवाई करावी

दिशा सालिनच्या वडीलांनी हात जोडून विनंती केली होती की, जे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आहे ते खरं आहे. एका 28 वर्षीय महिलचा मृत्यू झालेला असताना आणि लैंगिक अत्याचार झालेला नसतानाही तिच्या चारित्र्याचे ज्यापद्धतीने हनन होत आहे. त्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विनंती करणार की, या गंभीर गोष्टीकडे लक्ष द्या. त्यांच्यावर कारवाई करा. भाजपाच्या अनेक वेळा महिला, महिलामध्ये अनेकवेळा त्या चिवा ताईच येतात. त्यांनाही सांगेन यात महिला म्हणून लक्ष घाला. आपण सर्वांनी मिळून जे घडलं नाही ते घडलं म्हणून दाखवणे आणि त्या महिलेची मृत्यूनंतरही बदनामी चालू ठेवणे हे महाराष्ट्र आणि मुंबईला शोभा देत नाही. वारंवार भाजपाकडून महिलांचे हनन होत आहे. हे अनेकदा सांगितलं असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

सीबीआयच्या चौकशीत काय समोर आलं?

दिशा सालियान यांच्या प्रकरणात तरुण मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जातेय. माझं आव्हान आहे ज्या सीबीआयला केस दिली होती त्याचं काय झालं आम्हाला सांगावं,आमची उत्सुकता वाढते, प्रचंड राग येतोय की एका मुलीचा मृत्यू झाला पण तिच्या मृत्यूनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हणत जी बदनामी सुरु आहे त्याबाबत सर्व पक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे. हे महिलांच्या इज्जतीला जराही किंमत न देता ते स्वत:ला या पक्षातून त्या पक्षात… दिशा सालियान प्रकरणाच्या सीबीआय तपासाचं काय झालं त्याची चौकशी कोण करत होते हा तोच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. घेऊन या दाखवा आणि सिद्ध करा असे आव्हान महापौर पेडणेकरांनी नारायण राणेंना दिलं आहे.


हेही वाचा : गोवेकर, भिसे, अंकुश राणे, श्रीधर नाईकांच्या खुनामागे कोण?, विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार

First Published on: February 19, 2022 3:19 PM
Exit mobile version