घरताज्या घडामोडीगोवेकर, भिसे, अंकुश राणे, श्रीधर नाईकांच्या खुनामागे कोण?, विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार

गोवेकर, भिसे, अंकुश राणे, श्रीधर नाईकांच्या खुनामागे कोण?, विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार

Subscribe

राणेंनी इतरांवर आरोप करताना सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंच्या कारकिर्दीत खून, दरोडे, खंडणीसारखे प्रकरणं ९ वर्ष सुरु होते असा पलटवार खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियान आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नसून ती हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. तसेच या हत्येमध्ये मंत्र्याचा समावेश असल्याचा आरोप राणेंनी केला आहे. तसेच भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावरुन श्रीधर नाईक यांच्या खूनात प्रत्यक्ष आरोपी कोण होता? असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप नारायण राणेंसारख्या माणसाने करणं यासारखा विनोद असू शकत नाही असा पलटवार विनायक राऊतांनी केला आहे. तसेच रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे आणि अंकुश राणेंच्या खूनात कोण सहभागी होते आणि त्यांच्या खून कसे पचवले असा पलटवारसुद्धा विनायक राऊत यांनी राणेंवर केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या आरोपांवर पलटवार केला आहे. राणेंनी पूचाट आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांची गांभीर्याने दखल घ्यावीशी वाटत नाही. परंतु खुनाचे आरोप केले त्यावेळी नारायण राणेंना त्यांच्या वाढत्या वयामुळे विस्मरण झाले असेल. मुलांच्या उपद्व्यापामुळे मानसिक त्रास होत असेल. त्यामुळे भूतकाळ आठवत नसेल. राणेंनी इतरांवर आरोप करताना सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंच्या कारकिर्दीत खून, दरोडे, खंडणीसारखे प्रकरणं ९ वर्ष सुरु होते.

- Advertisement -

श्रीधर नाईकांच्या खुनात प्रत्यक्ष आरोपी कोण?

कोकणातील अंकुश राणे, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे हे खून कोणी केले आहेत. हे खून कशा पद्धतीने पचवण्यात आले. श्रीधर नाईक यांच्या खुनात प्रत्यक्ष आरोपी कोण होते याबाबत आम्हाला बोलायला लावू नका असा इशारा विनायक राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिला आहे. या खुनाच्या मागे खरा सूत्रधार कोण होता असा सवालच राणेंना केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा नारायण राणेविरोधातील गुन्ह्यांचा पाढा विधानसभेत वाचला होता. याचा एक व्हिडीओसुद्धा विनायक राऊतांनी दाखवला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून सिंधुदुर्गमध्ये ज्या हत्या झाल्या त्याची पुन्हा चौकशी करा आणि खरे गुन्हेगार कोण होते त्याचा शोध घ्या आणि त्या खुनाला वाचा फोडा अशी मागणी करणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले आहेत.

खोदा पहाड निकला कचरा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांना ट्विट करुन इशारा दिला होता. परंतु पत्रकार परिषद पाहिल्यानंतर खोदा पहाड आणि निकला कचरा अशी अवस्था असल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा गैरवापर करुन धमकी देणे हा केंद्रीय पदाचा दुरुपयोग आहे. यावरुन असा प्रश्न उपस्थित होतो की, एकतर ईडीच्या कागदपत्रांची चोरी केली असावी अन्यथा ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत हातमिळवणी केली असेल असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : दुसरा व्यक्ती असता तर मुख्यमंत्रिपदावर राहिला नसता, राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -