दुधाच्या किमतीत पाच रुपयांची वाढ, मुंबई दूध उत्पादक महासंघाचा निर्णय

दुधाच्या किमतीत पाच रुपयांची वाढ, मुंबई दूध उत्पादक महासंघाचा निर्णय

दुधाच्या किमतीत पाच रूपयांची वाढ करण्याबाबत मुंबई दूध उत्पादक महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे आणि ताज्या दुधाच्या किमतीत पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक महासंघाने घेतला आहे. अमूल आणि मदर डेअरीच्या दुधात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर आता मुंबई दूध महासंघाने हा निर्णय घेतला आहे.

ज्या दुधाची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते, अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. या पद्धतीच्या दुधाची विक्री घरोघरी जाऊन केली जाते. तूर, हरभऱ्याच्या किंमती १५ ते ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे ताज्या आणि सुट्या दुधाचे दर वाढवले असल्याचे मुंबई दूध उत्पादक महासंघाचे सदस्य सी. के. सिंह यांनी सांगितले.

मुंबई आणि ठाणे परिसरात एक लाख म्हशी आणि गाई असल्याची माहिती मुंबई दूध उत्पादक संघाने दिली आहे. त्यामुळे मुंबईत दर दिवशी सुटे ताजे दूध सात लाख लिटर विकले जाते. याआधी अमूलने त्यांच्या दुधाच्या किमतीमध्ये वाढ केली होती. अमूल दुधाच्या नवीन किमती १७ ऑगस्टपासून लागू झाल्या आहेत. दरम्यान, अमूल ब्रँड अंतर्गत येणाऱ्या अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताजा यांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.


हेही वाचा : ‘या’ सरकारला वठणीवर आणायला हवे, जयंत पाटलांचा इशारा


 

First Published on: August 29, 2022 8:13 PM
Exit mobile version