Home quarantine : होम क्वारेंटाईन व्यक्तीच्या हातावर ‘स्टँप’ मारणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

Home quarantine : होम क्वारेंटाईन व्यक्तीच्या हातावर ‘स्टँप’ मारणार, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

मुंबईत कोविड रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी व होम क्वारेंटाईनबाबतचे नियम मोडणाऱ्यांच्या हातावर पालिकेकडून ‘स्टॅम्प’ मारण्यात येणार आहे. मुंबईत सद्यस्थितीत ६ लाख ६३ हजार जण होम क्वारेंटाइन आहेत. मात्र सदर होम क्वारेंटाईन व्यक्तिने नियम मोडल्याबाबत कोणाची तक्रार पालिकेकडे आल्यास त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची रवानगी पालिकेच्या क्वारेंटाइन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. पालिकेने कोविडच्या यापूर्वीच्या दोन लाटांप्रसंगी अशी कारवाई केली होती.

होम क्वारेंटाइनचे नियम मोडत असल्याने रुग्ण संख्येचा वाढता धोका पाहता पालिकेने नाईलाजाने हा निर्णय घेतला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत सद्यस्थितीत तब्बल ६ लाख ६३ हजार जण होम क्वारेंटाइनमध्ये आहेत. मुंबईत कोविड व ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढ झाली होती. चार दिवसांपूर्वी कोविड रुग्णांची संख्या तब्बल २० हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे राज्य सरकार व पालिका प्रशासनाने मुंबईत काही निर्बंध लागू केले.

परिणामी गेल्या २४ तासात रुग्ण संख्या २० हजारावरून आता ११ हजारांवर घसरली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्याचे अधिकार प्रत्येक वार्डातील ‘फिल्ड ऑफसर’ला देण्यात आले आहेत. तसेच, क्वारेंटाइन नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आली आहे.


हेही वाचा : Maratha Reservation : मराठा आरक्षणावरील पुनर्विचार याचिका कोरोनामुळे पुढे ढकलली


 

First Published on: January 11, 2022 10:27 PM
Exit mobile version