मराठवाड्यात Mumbai NCB ची छापेमारी, १०० किलो ड्रग्जसह तीन जणांना अटक

मराठवाड्यात Mumbai NCB ची छापेमारी, १०० किलो ड्रग्जसह तीन जणांना अटक

मुंबई एनसीबीच्या पथकाकडून गेल्या काही दिवसांपासून राज्यात धाड सत्र सुरु आहे. सोमवारी एनसीबीच्या पथकाने मराठवाड्यातील ३ वेगवेगळ्या जिल्ह्यात छापेमारी केली. या छापेमारीत एनसीबीने १०० किलो ड्रग्जसह तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. एनसीबीकडून अद्यापही या ठिकाणी छापेमारी सुरु आहे. एनसीबीने नांदेडमध्ये ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. याशिवाय जालना आणि औरंगाबाद शहरातही छापेमारी करत मोठा ड्रग्ज साठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या मुंबई पथकाला नांदेड शहरात सोमवारी एका व्यापारी संकुलावर छापेमारी केली. या संकुलातील एक जागेवरून तब्बल एक क्विंटल अफू जप्त करण्यात आला आहे. एनसीबीने सोमवारी रात्री उशीरा ही कारवाई केली. कारवाईदरम्यान एनसीबीने तब्बल पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यापूर्वीच्या एका कारवाईत एनसीबीच्या पथकाने मांजरम येथून जवळपास ८ कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त केला होता.

एनसीबीने सोमवारी मराठवाड्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी मारल्या आहेत. यावेळी विशाखापट्टणम येथून गांजाचा साठा मराठवाड्यात येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. यावेळी एनसीबीने माळ टेकडी परिसरात शंकरराव चव्हाण चौकात असलेल्या व्यापारी संकुलात धाड मारली. या धाडीत एक क्विंटल अफू जप्त करण्यात आला आहे. या अफूची बाजारात ७ ते १२ हजार रुपये किलो दराने विक्री होत होती. अफू विक्रीवर बंदी असतानाही नांदेडमध्ये काहीजण बनावट आणि जुन्या परवान्याच्या आधारे अफूची विक्री करत होते.

समीर वानखेडेंच्या मुंबई एनसीबी पथकाकडून नांदेडमध्ये धाडसत्र सुरु

नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखान्यावर धाड टाकून मोठ्याप्रमाणात भुकटी पावडर एनसीबीच्या पथकाने जप्त केली. डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखान्यातील इतर सर्व मुद्देमाल जप्त करत एनसीबीने हा कारखाना सील केला आहे. मुंबई एनसीबी पथकाला रस्त्या लगत असलेल्या एका हॉटेलमागे हा कारखाना सुरु असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी एनसीबीने कारखान्यातून एका पोत्यामध्ये भरलेला डोडा व भुकटी अंमली पदार्थ जप्त केला आहे. तर तीन आरोपींना अटक केली आहे.


 

First Published on: November 23, 2021 2:51 PM
Exit mobile version