मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वे वाहतुकीसाठी बंद!

मुंबई – पुणे एक्स्प्रेस-वे वाहतुकीसाठी बंद!

Coronavirus: कर्फ्युनंतर लोकांची गावाकडे धाव; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

वुहान मधून आलेल्या करोना व्हायरसने महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आज हा आकडा ८९ वर गेला आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे हा संसर्ग अधिक प्रमाणात पसरु नये, याकरता सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. तसेच नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले. तर दुसरीकडे या सूचनांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करत मुंबई-पुण्याच्या रस्त्यावर उतरत एकच गर्दी केली. सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू असतानाच मुंबई-पुण्यातील नागरिक मात्र, बेपर्वाईने वागत होते. म्हणून पनवेल शहर पोलिसांनी पुण्याकडे जाणारा पनवेल – सायन महामार्ग अखेर बंद करण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊन ब्रेक केल्याने पोलिसांनी रोखली वाहतूक

सध्या मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत असून आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्य सरकारकडून नागरिकांना बाहेर न पडण्याचे वारंवार सांगितले जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती. या कर्फ्यूला नागरिकांनी उत्तम प्रतिसादही दिला. रात्रीपासून जमावबंदीही लागू करण्यात आली. मात्र, सोमवारी सर्व नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. बाहेर गावी जाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत होती. पनवेल सायन महामार्गावरही सकाळपासूनच वाहनांची गर्दी दिसून आली. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश गाकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अंकुश खेडकर यांनी सकाळी साडे अकरा वाजता पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग अखेर बंद केला. तर अत्यावश्यक असणाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात आले. तर इतरांना युटर्न मारण्यास सांगितले.

दरम्यान, अत्यावश्यक नागिकांना पुणे महामार्गावरुन एन्ट्री दिली जात आहे. इतर नागरिकांना पोलिसांकडून अटकाव केला जात आहे. जमलेल्या नागरिकांनी वाहने सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मात्र, असे असताना देखील पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त लावला असून पुण्याकडे कोणतीही गाडी सोडण्यात येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – बारावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात करोनावर धडा


First Published on: March 23, 2020 4:22 PM
Exit mobile version