बारावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात करोनावर धडा

12th book cover on corona

जागतिक महामारी असलेल्या कोरोनासारख्या रोगाचा सामना करताना सारे जग हतबल झाले आहे. या रोगाबद्दल फारशी माहिती कोठेच उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे. परंतु बारावी विज्ञानाच्या जीवशास्त्र आणि डॉ. रमेश गुप्ता यांच्या आधुनिक जीव विज्ञान या संदर्भ पुस्तकात ‘कॉमन कोल्ड’ या शीर्षकाखाली कोरोना विषाणू, त्याची लक्षणे आणि त्यावरील उपाय याची माहिती दिली आहे. कोरोनाचा सामना करण्यात हतबल ठरत असलेल्या जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनच्या पर्यायांची अंमलबजावणी केली आहे. चीन, इटली, स्पेन आणि अमेरिकासारख्या देशांनी कोरोनासमोर गुडघे टेकले आहेत. यावरील लस शोधण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी हा रोग नवीन नसल्याचे उघडकीस आले आहे.

करोनावर पुस्तकात एक पान माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विज्ञान शाखेच्या बारावी इयत्तेतील जीवशास्त्र या पुस्तकात कोरोना रोगावर एक पान माहिती देण्यात आली आहे. जीवशास्त्र या पुस्तकातील पान क्रमांक 166 वर ‘कॉमन कोल्ड’ या शीर्षकाखाली ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये खोकला, घसा खवखवणे, सर्दी, ताप अशी कोरोनाची लक्षणे दिली असून, हा आजार 7 ते 10 दिवस राहत असल्याचेही पुस्तकात म्हटले आहे. तसेच यामध्ये साबणाने हात स्वच्छ धुण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

12th book page on corona

करोनाच्या उपायांचाही उल्लेख

विज्ञान शाखेच्या बारावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकाप्रमाणे या अभ्यासक्रमासाठी असलेल्या संदर्भ पुस्तकामध्ये सुद्धा करोना
विषाणूवर धडा आहे. संदर्भ पुस्तकामध्ये करोना विषाणूचे छायाचित्र देण्याबरोबरच त्यावर औषधेही सुचवली आहेत. डॉ. रमेश गुप्ता लिखित या संदर्भ पुस्तकाच्या 1072 पानावर ‘कॉमन कोल्ड’ या शीर्षकाखाली दिलेल्या माहितीमध्ये हा आजार वातावरण बदलामुळे किंवा थंडीमध्ये होत असल्याचे म्हटले आहे. त्याचाबरोबर करोनाचे विषाणू हवेतून पसरतात. त्याचबरोबर करोनाग्रस्त व्यक्ती दरवाजाचे हँडल किंवा अन्य ठिकाणी हात लावला असेल त्याच ठिकाणी स्वस्थ व्यक्तीने हात लावल्यास तेथे राहिलेल्या कणातून हा विषाणू पसरत असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. गुप्ता यांच्या संदर्भ पुस्तकात करोनावर एस्पिरिन, अँटीहिस्टेमीन यासारख्या औषधांनी फरक पडत असल्याचेही म्हटले आहे.

12th book right