मुंबई – पुणेकरांनो जाणून घ्या कधी व कसे बघाल सूर्यग्रहण!

मुंबई – पुणेकरांनो जाणून घ्या कधी व कसे बघाल सूर्यग्रहण!

आज २१ जूनला होणारे सुर्यग्रहण भारतीतून दिसणार आहे. देशाच्या काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण तर काही भागात खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे. रविवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी तेथे सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून २ मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल. दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल, असे पंचांगकर्ते सोमण यांनी सांगितले.

या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. महाभारत युद्ध झाले त्या कुरूक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. महाराष्ट्रातून हे ग्रहण खंडग्रास दिसणार आहे.

मुंबई,पुण्यातून खंडग्रास दर्शन!

सकाळी १० वाजून ०१ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास सपरूवात होईल. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीतजास्त सुमारे ७० टक्के ग्रासित दिसेल. दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. महाराष्ट्रात सध्या अभ्राच्छादित आकाश आहे. परंतू मध्येच दुपारी सूर्यदर्शन होते. त्यामुळे सूर्यग्रहणाचे निरीक्षण करता येईल अशी आशा खगोलप्रेमीना वाटत आहे.

पुणे – सकाळी १०-०३ ते दुपारी १-३१,

नाशिक – सकाळी १०-०४ ते दुपारी १-३३,

नागपूर – सकाळी १०-१८ ते दुपारी १-५१ ,

औरंगाबाद – सकाळी १०-०७ ते दुपारी १-३७ यावेळेत हे सूर्यग्रहण दिसेल


हे ही वाचा – याचि देही याचि डोळा – असे अनुभवा सूर्यग्रहण!


 

First Published on: June 21, 2020 10:28 AM
Exit mobile version