कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० टक्के तर पालक गमावलेल्या विद्यार्थ्यींची संपुर्ण फी माफ, मुंबई विद्यापीठाचे निर्देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० टक्के तर पालक गमावलेल्या विद्यार्थ्यींची संपुर्ण फी माफ, मुंबई विद्यापीठाचे निर्देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० टक्के तर पालक गमावलेल्या विद्यार्थ्यींची संपुर्ण फी माफ, मुंबई विद्यापीठाचे निर्देश

कोरोनाच्या काळात उद्योग, व्यापार बंद असल्यामुळे नागरिकांना आर्थिक सामना करावा लागत आहे. अशामध्ये शाळा आणि महाविद्यालयांकडून फी वसूली करण्यात येत आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या फीमध्ये सवलत मिळावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. आता मुंबई विद्यापीठाकडून सर्व महाविद्यालयांना फी माफीचे निर्देश पाठवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ३० टक्के माफी तर ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे पालकत्व गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांना १०० टक्के फी माफी करावी असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

मुंबई विद्यापीठाकडून सर्व महाविद्यालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील फी माफ करण्याचे निर्देश दिले आहे. पदवी परीक्षा, वाणिज्य, कला आणि विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांची फी ३० टक्के माफ करण्यात यावी तर कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के फी माफ करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाकडून फी वसूलीबाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची फी संबंधित महाविद्यालयांना आकारता येईल मात्र ज्या महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रोग्राम होत नसतील तर अशा महाविद्यालयांना फी आकारता येणार नाही. तसेच जर महाविद्यालयाचे मॅगझीन प्रकाशित होत असेल तर या महाविद्यालयांनी २५ टक्केच फी आकारली पाहिजे. ज्या महाविद्यालयांचे मॅगझीन प्रकाशित होत नाही अशा महाविद्यलयांनी फी आकारु नये असे निर्देश मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत.

फी सवलतीचा तक्ता

First Published on: August 6, 2021 9:47 AM
Exit mobile version