Corona vaccination : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत रात्रीच्या वेळी लसीकरणावर भर, मुंबई महापालिकेकडून विशेष प्रयत्न

Corona vaccination : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत रात्रीच्या वेळी लसीकरणावर भर, मुंबई महापालिकेकडून विशेष प्रयत्न

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांच्या संख्या आणि मृत्यूची संख्येला आळा बसत आहे. परंतु राज्यात कोरोना महासाथीला रोखण्यासाठी मुंबईत लसीकरणावर भर दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून विशेष प्रयत्नांना सुरूवात केली आहे. मुंबईमध्ये लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी सोमवारपासून संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. तसेच रात्रीच्या वेळी सुद्धा लसीकरण केंद्रे रेल्वे स्थानक परिसरात असणार आहेत. त्यामुळे लसीकरणाचा फायदा हा सामान्यांना होणार आहे.

मुंबईतील नोकरदार आणि कष्टकरी वर्गाला लस घेण्यासाठी अद्यापही वेळ मिळत नाहीये. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेळ वाढावा आणि सर्व नोकरदार तसेच कष्टकरी वर्गाला लस मिळावी, यासाठी मुंबई महापालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अनेकजण रोजगारासाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्रीच्या वेळीच घरी जातात. त्यामुळे अनेकांना लस घेणे शक्य होत नाही. त्याशिवाय काही लोकांचा अद्यापही दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यामुळे त्यांनाही दुसरा डोस घेता यावा, यासाठी रात्रीच्या लसीकरण केंद्रांचा मोठा फायदा सामान्यांना होणार आहे.

लसीकरण केंद्रे ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. परंतु अनेकांना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता रात्री ११ वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार असून लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

ओमिक्रॉन विषाणूचा वाढतोय धोका

राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. मुंबईत ओमिक्रॉनची रूग्ण संख्या वाढत असल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोनावर उपयुक्त लस रात्रीही मिळणार असून पालिकेची लसीकरण केंद्रे आणि मोबाईल युनिट रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

टास्क फोर्सची सूचना पालिकेने गांभीर्याने घेतली असून पालिकेने प्लस पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर काही भागांत रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा : EPFOकडून खूशखबर! सरकारकडून ग्राहकांसाठी ८.५ टक्के व्याजाचा हप्ता जारी


 

First Published on: December 14, 2021 10:39 AM
Exit mobile version