वसतीगृहात विद्यार्थीनीची गळा दाबून हत्या

वसतीगृहात विद्यार्थीनीची गळा दाबून हत्या

प्रातिनिधिक फोटो

बुधवारी (आज) औरंगबादमध्ये एमजीएमच्या फिजिओथेरपी महाविद्यालयामध्ये आकांक्षा मास्टर्स ऑफ फिजिओथेरपीच्या प्रथम वर्षात शिकत होती. तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहात आकांक्षा चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये राहत होती. तिच्यासोबत २ खोलीत अन्य दोन विद्यार्थिनीही राहत होत्या. दरम्यान, ज्यावेळी आकांक्षाची हत्या झाली तेव्हा तिच्या दोन्ही रूममेट्स गावाला गेल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामुळे हत्या झाली त्यावेळी आकांक्षा खोलीत एकटीच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


वाचा: शिवसेना भवनातून रुग्णांना मिळणार मार्गदर्शन सेवा

सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आकांक्षाने बुधवारी सकाळी रूमचा दरवाजा न उघडल्याने वसतीगृहाच्या वॉर्डनला संशय आला. त्यानंतर जबरदस्तीने दरवाजा उघडून आत गेल्यावर त्याला आकांक्षा निपचित पडलेली आढळून आली. तातडीने तिला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. शवविच्छेदन अहवालानुसार आकांक्षाचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे हा खूनाचाच प्रकार असल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. सिडको पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
First Published on: December 12, 2018 10:32 PM
Exit mobile version