बोलतो कमी आणि काम जास्त करतो; पार्थचं ट्रोलर्सना उत्तर

बोलतो कमी आणि काम जास्त करतो; पार्थचं ट्रोलर्सना उत्तर

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीकडून मावळ मतसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. रविवार, १७ मार्च रोजी चिंचवडमध्ये मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवार यांच्या उपस्थित फोडण्यात आला. यावेळी अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या सभेदरम्यान सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष पार्थ पवार यांच्या भाषणाकडे होते. परंतु, त्यांचं भाषण अडखळत झाल्याने विरोधकांसह जारकीय स्थरातून खिल्ली (ट्रोल केल्याचं) उडवल्याच पाहायला मिळालं. याच आज पार्थ पवार यांनी प्रतिउत्तर दिलं असून मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो, असा टोला ट्रोल करण्याऱ्या व्यक्तींना लगावला आहे. ते वडगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले पार्थ पवार

पार्थ पवार म्हणाले की, माझं पहिल भाषण होतं. एक-दोन चुका झाल्या. याचा असा अर्थ नाही की त्यावरच लक्षकेंद्रीत करायला हवं. काही लोकं भाषण करतात आणि काम करत नाहीत. माझी वेगळी पद्धत आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो, असं म्हणत त्यांना ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना टोला लगावला आहे.

पहिल्याच भाषणाची खिल्ली उडवली 

पार्थ पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थित रविवारी राजकीय कारकीर्दमधील पहिले भाषण केले. माझं पहिलं भाषण आहे, ते ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमोर त्यामुळं काही चुकलं तर सांभाळून घ्या, असं आवाहन जाहीर सभेत कार्यकर्त्याना पार्थ पवार यांनी केलं होतं. त्यानंतर पार्थ हे भाषण करताना अडखळले यावरून राजकीय स्थरासह सामान्य नागरिकांना पार्थ पवार यांना सोशल मीडियावर ट्रोल केले होते. तसेच विरोधकांनी खिल्ली उडवली होती. त्याच चोख प्रतिउत्तर पार्थ पवार यांनी दिले.

First Published on: March 20, 2019 4:54 PM
Exit mobile version