मायलॅबचे १ कोटी CoviSelf कोरोना चाचणी किट निर्मितीचे उद्दिष्ट

मायलॅबचे १ कोटी CoviSelf कोरोना चाचणी किट निर्मितीचे उद्दिष्ट

मायलॅबचे १ कोटी CoviSelf कोरोना चाचणी किट निर्मितीचे उद्दिष्ट

पुणे स्थित असलेल्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सनच्या ‘कोविसेल्फ’ (coviSelf) या चाचणी कीटला वापरण्यास काल (गुरुवार) केंद्र सरकारच्या इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली. या किटद्वारे घराच्या घरी आता कोरोना चाचणी करणं शक्य होणार आहे. यासाठी नाकातील स्वबची आवश्यकता असणार आहे. या किटला वापरण्यास मंजुरी मिळताच आज (शुक्रवार) मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सनकडून १ जून रोजी राष्ट्रीय रोलआउट होण्यापूर्वीच १ कोटी सेल्फ कोरोना चाचणी कीट तयार करणार उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी आयसीएमआरने नागरिकांना घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. त्यानंतर आयसीएमआरने ज्याच्या द्वारे घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, त्या CoviSelf या किटला वापरण्यास मंजूरी दिली. या कोविसेल्फच्या माध्यमातून तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही हे १५ मिनिटात समजणार आहे. कोविसेल्फ या कोरोना चाचणी कीटची किंमत २५० रुपये इतकी असणार आहे.

मायलॅबचे सहसंस्थापक श्रीकांत पाटोळे शुक्रवारी म्हणाले की, ‘आम्ही लोणावळा येथे दिवसाला १० लाख किट्स तयार करत आहोत. येत्या १० दिवसांत आम्ही १ कोटी किट्स तयार करून साठा केल्यानंतर १ जूनपर्यंत राष्ट्रीय पातळीवर लाँच करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.’

पुढे पाटोळे म्हणाले की, ‘मेडिकलमध्ये उत्पादन नसल्यामुळे लोकांमध्ये चिंता निर्माण होऊ शकते आणि यामुळे बाजारात येण्यापूर्वी एक उद्दीष्ट तयार करून लाँचपूर्वी पर्याप्त स्वरुपात साठा असणे आवश्यक आहे. दरम्यान कंपनीकडे यासाठीचा पर्याप्त कच्चा माल आहे आणि एका दिवसात १० लाख किट्सचे उत्पादन करण्याचा अधिकार आहे. पण येत्या पंधरवड्यात यांची संख्या वाढून दिवसाला १५ लाख किट्स तयार केले जातील.’


हेही वाचा – कोव्हिशील्डचा पहिला डोस कोवॅक्सीनपेक्षा अधिक प्रभावी- ICMR


 

First Published on: May 21, 2021 2:57 PM
Exit mobile version