नगरच्या अर्बन बँक घोटाळ्यात भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल

नगरच्या अर्बन बँक घोटाळ्यात भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल

नगरच्या अर्बन बँक घोटाळ्यात भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल

नगरच्या अर्बन बँकेत तीन कोटींची फसवणूक केल्याने भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम अच्यत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७ साली पैशांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी बँकेचे अधिकारी मारूती औटी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या आमदारांसोबत बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार दिपील गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकिय वर्तुळावर एकच खळबळ उडाली आहे. नगर अर्बन बँकही या घोटाळ्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अर्बन बँकेत कोट्यावधीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी बँकेच्या काही सभासदाकडून करण्यात आली आहे. या चौकशीसाठी विविध शासकीय यंत्रणांकडे हे सभासद पाठपुरवठा करत होते. आज बँकेचे सभासदांसोबत पोपट लोढा, बहिरनाथ वाकळे, मनोज गुंदेचा इत्यादींनी बँकेच्या प्रशासकांच्या दालनामध्ये आंदोलन केले. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही दालनातून उठणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यानंतर बँकेच्या प्रशासकांनी कोट्यावधीचा घोटाळा करणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली गेली.

तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, बँकेचे माजी चेअरमन, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी आणि इतर सदस्यांनी कट रचून,खोटी कागदपत्रे तयार करून बँकेत तब्बल तीन कोटी रूपये रक्कमेचा घोटाळा करून ठेवीदार आणि सभासद यांचा विश्वासघात केला आहे, असे म्हटले आहे. त्याचबरोबर आरोपींनी स्वत:च्या अधिकारांचा गैर वापर करून १३ खोटी प्रकरणे मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींनी या प्रकरणी बँकेच्या रकमेची चोरी, अफरातफर आणि फसवणूक केली आहे. या तक्रारीवरून माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – दररोज १२ हजार भाविकांना घेता येणार साईबाबांचे दर्शन

 

First Published on: December 22, 2020 9:00 PM
Exit mobile version