नागपूरमध्ये रुग्णालयात कोरोना नियमांचे उल्लंघन, नागरिकांकडून लॉकडाऊनचा फज्जा

नागपूरमध्ये रुग्णालयात कोरोना नियमांचे उल्लंघन, नागरिकांकडून लॉकडाऊनचा फज्जा

नागपूरमध्ये रुग्णालयात कोरोना नियमांचे उल्लंघन, नागरिकांकडून लॉकडाऊनचा फज्जा

राज्यात कोरोना रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. नागपूरमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूरमध्ये आठवड्याभराच्या लॉकडाऊनसह काही निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु या लॉकडाऊनमध्ये काही अस्थापनांना मुभा देण्यात आली आहे. यामध्ये कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस्था सुरु आहे. यामुळे लॉकडाऊन असूनही रस्त्यावर लोकांची गर्दी दिसत आहे. नागपूरात विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाईन करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. परंतु नागपूरातील वर्धमाननगरातील डॉ.मनोज पुरोहित यांच्या रेडियंस हॉस्पिटलमध्ये एकाच कक्षात कोरोना लसीकरण केले जात होते. व त्याच कक्षात कोरोना लसीकरणासाठी नोंदणी सुरु होती. यामुळे रुग्णालयातील कक्षात गर्दी होत होती. उपमहापौर मनीषा धावडे यांनी सोमवारी पाहणी केली यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरु असून परिचारिकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. तसेच रुग्णलयाच्या लगतचा परिसरही अस्वच्च असल्याचे निदर्शनास आले. यामुळे रेडियंस हॉस्पिटलला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेकडून ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रुग्णालयाला दंड ठोठावण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.

रेडीयंस रुग्णालयानंतर इतरही ठीकाणांवर धाडसत्र चालवले यामध्ये महापालिकेने १.६८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेने ६४ मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच महानगपालिकेच्या सर्व झोनमध्ये सुमारे १५१ खासगी कार्यलयांची तपासणी केली. महापालिकेने काही हॉटेल्सवर कारवाई केली आहे.

First Published on: March 16, 2021 5:22 PM
Exit mobile version