नागपूर महानगरपालिकेत भाजपचा ‘सव्वा-सव्वा’ फॉर्म्युला

नागपूर महानगरपालिकेत भाजपचा ‘सव्वा-सव्वा’ फॉर्म्युला

Nagpur Municipal corporation

महापौर पदासाठी झालेल्या सोडतीत नागपूर महापालिकेचे महापौर पद खुल्या वर्गासाठी जाहीर झाले. तेव्हापासूनच नागपूर महापालिकेचे महापौर कोण असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. नागपूर महानगरपालिकेत पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पद सव्वा – सव्वा वर्षासाठी विभागण्यात आले आहे. पहिले सव्वा वर्ष संदीप जोशी तर नंतरचे सव्वा वर्ष दयाशंकर तिवारी हे महापौर असतील, असा निर्णय आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच उपमहापौर पदही सव्वा वर्षांसाठी विभागण्यात आले असून पहिले सव्वा वर्ष मनीषा कोठे यांच्याकडे तर त्यानंतरचे सव्वा वर्ष उपमहापौर कोण असणार हे नंतर ठरवण्यात येणार आहे. तसेच सभागृह नेते (सत्तापक्ष नेते) पदावर संदीप जाधव यांची वर्णी लागणार आहे. 149 नगरसेवक असलेल्या नागपूर महापालिकेत भाजपचे 106 नगरसेवक असल्याने महापौर हा भाजपचाच असणार एवढे निश्चित होते.

या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका महापालिका निवडणुकीत बसू नये, याचीही काळजी भाजपने घेतली आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज भाजपतर्फे अर्ज दाखल करण्यात आले असून 22 नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे.

First Published on: November 19, 2019 3:17 AM
Exit mobile version