नागपुरात राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार हनुमान चालिसा पठण; पुन्हा वादाची शक्यता

नागपुरात राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार हनुमान चालिसा पठण; पुन्हा वादाची शक्यता

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि पती रवी राणा (Ravi Rana) आज नागपुरातील (Nagpur) रामनगरच्या प्रसिद्ध मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार असून, नागपुर पोलिसांनी (police) त्यांना परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राणा दाम्पत्याने विमानतळ ते रामनगरपर्यंत बाइक रॅलीसाठी परवानगी मागितली होती. या बाईक रॅलीला पोलिसांनी नाकारली असून, हनुमान चालीसाला अटींसह परवानगी दिली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला राणा दाम्पत्य जबाबदार असेल, असेही या अटीत म्हटले आहे.

हनुमान चालिसा पठण

राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला हा वाद आज आमनेसामने पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या दोघांनाही लाऊडस्पीकरचा वापर करू देणार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सुमारे एक हजार कार्यकर्ते रामनगर येथील मंदिरात 12:00 वाजण्याच्या सुमारास हनुमान चालिसा पठणासह रामायणाच्या सुंदरकांडाचे पठण करणार आहे. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्याला आव्हान देताना ते म्हटले की, पुस्तकाशिवाय हनुमान चालीसा पाठ करा आणि दाखवा.

याआधी राणा दाम्पत्याने दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महाआरती केली होती. महाराष्ट्रासारखा धोका दिल्लीला नाही हे राणा दाम्पत्याला चांगलेच माहीत होते. अन्यथा मुंबईत उद्धव ठाकरेंना आव्हान दिल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणाने पतीसोबत थेट दिल्ली गाठली आणि तेव्हापासून दोघेही तिथेच थांबले आहेत. त्यानंतर आज दोघेही अमरावतीला रवाना होणार आहेत.


हेही वाचा – 100 वर्षांहून अधिक जुन्या मशिदींचे सर्वेक्षण करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

First Published on: May 28, 2022 10:13 AM
Exit mobile version