‘नौटंकी बोलून सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?’; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

‘नौटंकी बोलून सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?’; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

देवेंद्र फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा नौटंकी आहे का? नाना पटोलेंचा खोचक सवाल

इंधन दरवाढविरोधात काँग्रेसच्या सुरु असलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नौटंकी म्हणत आंदोलनाची खिल्ली उडवली. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवंद्र फडणवीस यांना नौटंकी बोलून सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? असा सवाल केला आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसने नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनपर्यंत सायकल रॅली काढली. त्यानंतर काँग्रेसतर्फे राज्यपालांना इंधन दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आलं

राज्यपालांना भेटल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “काँग्रेसने सायकल रॅली काढला ही नौटंकी वाटत असेल तर सामान्य जनतेचं जगणं मुश्कील केलं भाजपच्या सरकारने केलं आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत का?” असा सवाल नाना पटोले यांनी फडणवीस यांना केला.

पवारसाहेब आमच्यावर नाराज नाहीत

नाना पटोले हे गेले काही दिवस वक्तव्यांनी चर्चेत आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर नाना पचोले यांनी बोलताना शरद पवार आमच्यावर नाराज नाहीत, असं सांगितलं. “शरद पवारसाहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष्य आहेत. त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. माझा पक्ष वाढवणे माझा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवारसाहेब आमच्यावर नाराज नाही आहेत. भाजपाकडून महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्यासोबत गेलेल नेते पळून जाऊ नयेत म्हणून अशा प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे पटोले म्हणाले. संघटना आणि सरकारमध्ये फरक असतो. सर्वच जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याचा कोणी विरोध करण्याचे कारण नाही,” असं नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा – नाना पटोलेंच्या नेतृत्त्वात काँग्रेसची सायकल रॅली; महागाईबाबत राज्यपालांना दिलं निवेदन


 

First Published on: July 15, 2021 2:09 PM
Exit mobile version