खेल रत्न पुरस्काराच्या नामकरणावरुन नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

खेल रत्न पुरस्काराच्या नामकरणावरुन नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा

खेल रत्न पुरस्काराला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाचे नामांतर करुन त्याचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे  देण्यात आले. खेल रत्न पुरस्काराच्या नामकरणावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले  यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधलाय. (nana patole Slam BJP over khel ratna award ) ‘ज्या राजीव गांधींनी देशाच्या तरुण पिढीला एक दिशा दिली, आधुनिक भारताला देशाला नेले अशा भारतरत्न राजीव गांधी यांचे नाव कमी करणे हा भाजपच्या मानसिकतेतील फरक आहे.  शब्दफेर करायचा आणि लोकांच्या त्याच्या मागे लावायचे आणि लोकांना मुळ उद्देशापासून दूर करायचे ही भाजपची रणनीती आम्ही सातत्याने पाहत आलो आहोत. भाजपच्या मनोरुग्ण व्यवस्थेचा हा परिणाम आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

भाजपचे मनोरुग्ण आणि द्वेष पद्धतीचे राजकारणाचा भाजप वेळोवेळी परिचय करुन देत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव पुसून स्वत:चे नाव लिहिणारा प्रधानमंत्री आपण नरेंद्र मोदींच्या रुपाने पाहतो आहोत. आमचा कोणाच्याही नावाला विरोध नाही. आपल्याला नवीन इन्स्टीट्यूट तयार करुन त्यांनी नवीन नावे देत आली असती. नावाच्या भानगडीत पडण्यापेक्षा देशातील बेरोजगार आणि शेतकऱ्यांचा प्रश्न, महागाई यासारख्या समस्यांकडे पंतप्रधानांनी बघावे,असे म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.


हेही वाचा – भाजप – मनसे युतीचा निर्णय अमित भाईंचा – चंद्रकांत पाटील

First Published on: August 7, 2021 11:22 AM
Exit mobile version