सत्तेच्या नावाखली भ्रष्टाचार करणं हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंचा घणाघात

सत्तेच्या नावाखली भ्रष्टाचार करणं हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंचा घणाघात

नाना पटोले यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. भाजप सत्तेच्या नावाखाली भ्रष्टाचार करतं हे पुण्यातील नागरिकांना चांगले माहिती असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपला आगामी निवडणूकीत घरी बसवण्याच्या दृष्टीने काँग्रेसची तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच पुण्यातील जनता आता पुणे महापालिकेत काँग्रेसला स्थान देईल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नाना पटोले यांनी म्हटले आहे की, आता तुम्ही पॉलिसी डिसीजन घेतला आहे. त्यामुळे आता स्थानिक स्तरावर स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचे वारंवार सांगावे लागणार नाही. पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत आलेला पैसा, पुणे महापालिकेत होत असलेला भ्रष्टाचार याबाब पुण्यातील नागरिकांना सर्व माहिती आहे. सत्तेच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं भाजपचा धंदा असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

पुण्यातील जनता आता भाजपला घरी बसवून काँग्रेसला पुणे महापालिके स्थान देईल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ देशांना लसीचा पुरवठा केला. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताला दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाबाहेर १७ देशांना लसींचा पुरवठा केला. मोदींनी पाकिस्तानलाही पुरवठा केला ज्या देशाना आपले जवानांचा प्राण घेतला त्यांनाही मोदींनी मोफत लस दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाबाहेर दिलेली लस देशातील नागरिकांना द्यायला पाहिजे होती. परंतु त्यांनी तसे काही केले नाही. लसीकरणाचे योग्य नियोजन केले असते तर देशात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली नसती. उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत प्रेत वाहताना दिसली नसती असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

First Published on: July 23, 2021 9:13 PM
Exit mobile version