येत्या काळात विरोधकांचे अनेक घोटाळे उघड होतील; नाना पटोलेंचा भाजपला इशारा

येत्या काळात विरोधकांचे अनेक घोटाळे उघड होतील; नाना पटोलेंचा भाजपला इशारा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. या मागणीचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजपला इशारा दिला आहे. पुढील काळात विरोधकांचे अनेक घोटाळे उघड होतील, असा इशाराच पटोले यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्र्यांवर देखील आरोप झाले. तेव्हा तुम्ही राजीनामे घेतले होते का? नाही घेतले. फडणवीस स्वत: न्यायाधीश बनून क्लिन चिट देत होते. तुम्ही दूधाने धुतलेलं असता तर तुम्हाला अधिकार आहे. पण तुम्ही चिखलामध्ये फसलेली लोकं आहात, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर केला. या लोकांनी उंदाराचा घोटाळा केला. मंत्रालयात उंदीर पकडायचे दहा आणि दाखवायचे लाख. उंदीरांमध्ये पण पैसे खाल्ले. पुढील काळात यांचे सर्व घोटाळे पुढे येतील. उंदीर घोटाळा, चहा घोटाळा…आता चहावाल्यांचीच लोकं असल्यामुळे चहा घोटाळा करणारच… असा घणाघा नाना पटोले यांनी केला.

राज्य सरकारवर टीका करताना विरोधकांकडून महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातून महाराष्ट्राचं चुकीचं चित्र देशात दाखवण्याचं पाप भाजपनं केलं आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

 

First Published on: March 25, 2021 12:55 PM
Exit mobile version