पब्जी खेळण्याच्या नादात नांदेडचा मुलगा तपोवन एक्सप्रेसने पोहचला थेट नाशिकला

पब्जी खेळण्याच्या नादात नांदेडचा मुलगा तपोवन एक्सप्रेसने पोहचला थेट नाशिकला

नाशिक : बंदी असतानाही लहान मुलं पब्जी गेम खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पब्जी खेळण्याच्या नादात नांदेडमध्ये राहाणारा बारा वर्षांचा मुलगा थेट तपोवन एक्सप्रेस मध्ये बसला आणि त्याने नाशिक गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. पब्जी खेळायला घरात विरोध होता. त्यामुळे खेळण्यासाठी मोबाईल घेऊन घरातून निघून गेला. रेल्वेत जाऊन बसला.

आई-वडिलांनी मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु करत मुलाचा मोबाईल ट्रॅक केला. यावेळी तो मुलगा मुंबई-तपोवन एक्स्प्रेसने मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली. एक्स्प्रेस नाशिकमध्ये पोहचल्यावर नाशिक पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलं. यानंतर त्या मुलाला कुटुंबांच्या स्वाधिन करण्यात आलं.

गेमवर आहे बंदी

पब्जी गेमच्या वेडापायी काहींनी आपले प्राण गमावले तर काहींनी आपले मानसिक स्वास्थ बिघडवून घेतले. त्यामुळे गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून होत होती. याची गंभीर दखल घेत केंद्रानेही या गेमवर बंदी आणली. मुलं आणि तरुणांमध्ये ‘पब्जी’ (PUBG) या ऑनलाईन मोबाईल गेमची अत्यंत ‘क्रेझ’ आहे. पण या गेममुळे मुलांमध्ये हिंसा, आक्रमकता, ऑनलाईनचे वेड आणि व्यसनाधीनता वाढत आहे.

First Published on: May 6, 2022 11:34 AM
Exit mobile version