मुंबईकर जनता तुमच्या महापालिकेच्या कारभाराला कंटाळली – नारायण राणे

मुंबईकर जनता तुमच्या महापालिकेच्या कारभाराला कंटाळली – नारायण राणे

दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने राज्याला मागे घातल, अधोगतीकडे नेले. या गोष्टी येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत उघड होणार आहेत. मुंबईतील जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. वांद्रे कलानगर येथील टीचर्स कॉलनीत जन आशीर्वाद यात्रेत ते बोलत होते. मुंबई महापालिकेचा कारभार तुमच्या हाती राहणार नाही असेही राणेंनी यावेळी स्पष्ट केले. वांद्र्यात असताना सरकारच्या कानावर काही गोष्टी जायला हव्यात असेही त्यांनी याठिकाणी स्पष्ट केले. मातोश्रीला उद्देशून नारायण राणे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मुद्द्याच्या निमित्ताने थेट जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आव्हान दिले. वांद्र्यात येऊन राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्राने मला आतापर्यंत खूप काही दिल आहे. केंद्रीय मंत्रीमंडळासाठी दिल्लीचा रस्ताही मोकळा करून दिला असेही राणे यावेळी म्हणाले. काही गोष्टी वांद्र्यात असताना कानावर जायला हव्यात असेही राणे म्हणाले. महाराष्ट्राची जनता आता सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा विकास करू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नावाप्रमाणेच उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेल्या सरकारला सांगुयात की आता तुमचा काळ संपला आहे. आता भाजप सत्तेत येणार आहे, अशी तुमचा काळ संपला आहे, अशी टीका नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. लवकरच महाराष्ट्रातील जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस पहायला मिळतील असेही आश्वासन राणेंनी दिले. मुंबईत जन आशीर्वाद यात्रेसाठी नारायण राणे बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. राज्यात इतर ठिकाणी मंत्र्यांची आधीच जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. परत भाजपची सत्ता यावी म्हणून या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित आहे. गर्दी भरपूर करा, पण कोरोनाचे नियम पाळा असेही राणे म्हणाले. आपण महाराष्ट्राला वाचवायला निघालो आहोत. त्यामुळेच महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेल्या लोकांना संदेश देऊयात. तुमचा काळ आता संपला आहे. भाजपची सत्ता महाराष्ट्रात येऊन आता गोरगरीब तरूणांना रोजगार मिळू शकतील आणि प्रगतीकडे वाटचाल करता येईल यासाठी प्रयत्न करूयात असेही राणे म्हणाले.


हे ही वाचा – मुख्यमंत्री नावाप्रमाणे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेत – नारायण राणे


 

First Published on: August 19, 2021 12:29 PM
Exit mobile version