नव्या वर्षात भाजप सरकार येईल, चंद्रकांतदादांच्या वक्तव्यावर नारायण राणे म्हणतात खरे…

नव्या वर्षात भाजप सरकार येईल, चंद्रकांतदादांच्या वक्तव्यावर नारायण राणे म्हणतात खरे…

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्रीय लघू सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नारायण राणे यांनी देखली रि ओढली आहे. येत्या वर्षात महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल असे विधान चंद्रकांत पाटील यांनी काहीतरी अंदाजाने केले असेल त्यामुळे ते खरे होईल असे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी नारायण राणे म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या वर्षात भाजप सरकार येणार असल्याचे वक्तव्य केलं आहे. त्यांनी काहीतरी अंदाजानुसार असं म्हटलं असेल त्यामुळे त्यांचे बोलणं खरे होईल असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

शरद पवार केवळ खेळवत ठेवतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर बैठक घेतली होती. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, शरद पवार विषयावर तोडगा कधीच काढत नाहीत खेळवत ठेवणं त्यांचे काम आहे. तोडगा कधीच काढणार नाहीत. ज्यांनी राज्य सरकार बनवले ते शरद पवार परिवहन विभागाला सांगू शकत नाहीत का? कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांशी चर्चा करणार

केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत की हा प्रश्न त्वरित मिटवा अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ आणि मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन यावर मार्ग काढण्याची विनंती करेल तेच राज्यातील परिवहन मंत्री अनिल परब त्यांच्यासोबतही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोलेल असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार यांच्यात चार तास खलबतं, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा


 

First Published on: November 22, 2021 7:48 PM
Exit mobile version