आमच्या दौऱ्याच्या माहितीमुळे मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौरा केला, नारायण राणेंचा आरोप

आमच्या दौऱ्याच्या माहितीमुळे मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौरा केला, नारायण राणेंचा आरोप

आमच्या दौऱ्याच्या माहितीमुळे मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौरा केला, नारायण राणेंचा आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहे. पाहणी दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नरायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमच्या दौऱ्याच्या माहितीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण दौरा केला आहे. मुख्यमंत्री कालपर्यंत रुग्णालयात अॅडमिट होते अचानक त्यांना मातोश्रीतून डिस्चार्ज मिळाल्यावर दौऱ्यावर आले असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच चिपळूणमधील व्यापारी आणि नागरिकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केंद्र सरकारद्वारे करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही आहे. नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, काल ६.३० वाजता चिपळूण आणि रायगडमध्ये जाणार असल्याचा फॅक्स आला त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला आहे. मतोश्रीचा दरवाजा तेव्हा उघडला, माझ्या दौऱ्याच्या माहितीनंतर मुख्यमंत्र्यांना मातोश्रीमधून डिस्चार्ज मिळाला. ते थेट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री कसली संवेदना, मुख्यमंत्र्यांनी दुर्घटना झाल्या झाल्या उपस्थित राहायला पाहिजे होते. हेलिकॉप्टर मिळत नाही मग उभं राहून हे सगळा बंदोबस्त करायला पाहिजे होता. पूरात असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेणं, लोकांच्या कपड्यांची, जेवणाची सोय करायला हवी होती जी आता भाजपकडून करण्यात येत आहे. या राज्यात मुख्यमंत्री नाही संवेदनशीलता नाही अशी भयावह परिस्थिती असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांना अहवाल सादर करणार

चिपळूणमध्ये पाणी बाजारपेठेत घुसले घराघरांमध्ये घुसलं आहे. संपुर्ण बाजारपेठेची पाहणी केली. सगळ्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुकानातील ओलं सामान रस्त्यावर टाकलेलं पाहिले आहे. व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आहेत. दिल्लीत असताना अनेक जणांचे फोन आले परिस्थिती भयान आहे. यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत माहिती दिली त्यांनी मला दौरा करुन अहवाल सादर करायला सांगितले आहे. त्यानुसार चिपळूण आणि महाडचा दौरा केला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर मदत करणार

या दौऱ्यादरम्यान चिपळूणमधील व्यापाऱ्यांशी चर्चा केली. चिपळूमधल्या लोकांनी, व्यापाऱ्यांनी विम्याचे पैसे अॅडवान्स देण्यात यावे, नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच जी घरे गेली आहेत त्यांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांना निवेदन देण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारकडून ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ते पाहणार आहोत अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन गेले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे आढावा घेऊन राज्य सरकारद्वारे जी काही मदत करता येईल ती करतील परंतु मी दिल्लीला गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर जी काही मदत करणं शक्य होणार आहे ती तात्काळ करण्यात येईल. चिपळूणमधील व्यापारी पुन्हा आपल्या पायावर कसा उभा राहिल याबाबत तात्त्काळ पाउलं उचलली जातील अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

आम्ही पाहायला आलो नाही

चिपळूमधील माणसं आमची असून आमच्या घरातली माणसं आहेत. त्यांच्या घरात पुन्हा पाणी शिरणार नाही याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. आम्ही नुसतं पाहयाला आलो नाही आमच्या घरातली माणसं आहेत. माणसं बेघर झाली असून त्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी आलो आहे. यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे ठरवले आहे. मदत करणं आमचं कर्तव्य आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही

इथलं प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियामांची, प्रोटोकॉलची माहिती नाही. बाजारपेठेत आल्यावर एकही अधिकारी येऊन भेटले नाहीत. अॅडिशन कमिश्नर, प्रांत अधिकारी कार्यालयात बसून आहेत दोन विरोधी पक्षनेते, एक केंद्रीय मंत्री चिपळूणमध्ये आले असूनही ते भेटायला आले नाही. हा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आहे आणि त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय माझ्यासारखा माणूस गप्प बसणार नाही. केंद्रीय विभागात कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे अधिकारी खुर्चीवर आमच्या विभागात राहता कामा नये लोकं रडत आहेत आणि अधिकारी मुख्यमंत्र्यांना पोहचवायला गेले आहेत. मुख्यमंत्री पाहुणे आहेत का? त्यांचे कामच आहे. अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वोतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


 

First Published on: July 25, 2021 4:46 PM
Exit mobile version