मिलिंद नार्वेकर नवीन शिवसेना प्रमुख आहेत का?, नारायण राणेंची खोचक टीका

मिलिंद नार्वेकर नवीन शिवसेना प्रमुख आहेत का?, नारायण राणेंची खोचक टीका

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी पतनाच्या स्मृती जागवल्या आहेत त्यांनी शिवसैनिकांच्या बलिदानाला कोटी कोटी नमन असे ट्विट केलं आहे. यावरुन नारायण राणे यांनी प्रश्न करत नार्वेकरांवर खोचक टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर नवे शिवसेना प्रमुख आहेत का? असे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी फडणवीसांना नार्वेकरांनी शिवसैनिकांना बाबरी पतनातील बलिदानाला कोटी कोटी नमन केलं असल्याचे सांगितले आहे. यावर नारायण राणे यांनी उत्तरात मिलिंद नार्वेकर काय नवे शिवसेना प्रमुख आहेत का? असा खोचक सवाल करत टीका केली आहे. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि देवेंद्र फडणवीस देखील हसू लागले.

फडणवीसांची नार्वेकरांच्या ट्विटवर प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचा ट्विट योग्य असून त्यात काय चूक आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. बूथ प्रमुखांची बैठक सगळ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये घेत आहोत. यामध्ये प्रशिक्षण, पक्षाचा विचार आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

मिलिंद नार्वेकरांचे ट्विटमध्ये काय म्हणाले?

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत शिवसैनिकांच्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम केले आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मस्जिद पतानाचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोवर अयोध्येच्या राम मंदिर निर्मितीसाठी शिवसैनिकांनी दिलेल्या बलिदानाला कोटी कोटी नमन असा मजकूर लिहिला आहे. नार्वेकरांच्या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.


हेही वाचा :  माझ्यासोबत नमाज पढायला नियमित यायचे, चैत्यभूमीवरील विरोधानंतर मलिकांचा वानखेडेंवर निशाणा


 

First Published on: December 6, 2021 12:21 PM
Exit mobile version