मातोश्रीच्या चौघांना लवकरच ईडीची नोटीस मिळणार, नारायण राणेंचा ट्विट करुन सूचक इशारा

मातोश्रीच्या चौघांना लवकरच ईडीची नोटीस मिळणार, नारायण राणेंचा ट्विट करुन सूचक इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवेसेना यांच्यातील वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. मातोश्रीच्या चौघांना लवकरच ईडीची नोटीस मिळणार असल्याचे कळतंय असे ट्विट नारायण राणे यांनी करुन इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी नारायण राणे यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु आरोपांच्या चर्चेत हा मुद्दा मागे पडला होता तो आता नारायण राणेंनी पुन्हा पुढे आणत सूचक इशारा दिला आहे. ही खासदार विनायक राऊत यांना खास बातमी असल्याचे नारायण राणे यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये नारायण राणेंनी मोठं विधान केलं आहे की, ई़डीच्या रडारवर मातोश्रीतील चौघे जण आहेत. नारायण राणे यांच्या मुंबईतील बंगल्यावर महापालिका सहायक उपायुक्तांनी भेट दिली. नारायण राणेंच्या बंगल्यात झालेल्या बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी महापालिकेची टीम गेली होती. नारायण राणेंनी परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केले असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र या कारवाईनंतर नारायण राणेंनी सूचक ट्विट करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करुन शिवसेना आणि खासदार विनायक राऊतांना सूचक इशारा दिला आहे. ‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’ अशा आशयाचे ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत काय खुलासा करणार? याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. सूशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केली परंतु त्याची हत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुशांतच्या आत्महत्येबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच दिशा सालियनची आत्महत्या संशास्पद असल्याचेही राणे यांनी यापूर्वी म्हटलं आहे.


हेही वाचा : ठाणे -दिवा मार्गात 2014 मध्ये अनेक अडथळे मात्र भाजप सरकारमुळे गती मिळाली, पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा

First Published on: February 18, 2022 6:30 PM
Exit mobile version