घरताज्या घडामोडीठाणे -दिवा मार्गात 2014 मध्ये अनेक अडथळे मात्र भाजप सरकारमुळे गती मिळाली,...

ठाणे -दिवा मार्गात 2014 मध्ये अनेक अडथळे मात्र भाजप सरकारमुळे गती मिळाली, पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा

Subscribe

लोकल आणि एसटी स्टँडला वेगळी लाईन असेल. तसेच दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्या ट्रेनला लोकल पास होण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनलवरुन कोणथ्याही अडथळ्याशिवाय रेल्वे धावतील.

मुंबई लगत असलेल्या ठाणे-दिवा 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या मार्गिकेचे शिलान्यास 2008 मध्ये करण्यात आले असून 2015 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे होता. मार्गिकेच्या कामात अनेक अडथळे आले परंतु भाजप सरकार सत्तेत आल्यामुळे अडथळे दूर करुन कामाला गती मिळाली असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच ठाणे- दिवा या दरम्यान दोन मार्गिकांचे लोकार्पण झाल्यामुळे मुंबईला ४ फायदे होणार आहेत. मुंबईकरांचा प्रवास आता वेगवान होणार असून विकासासाठी मोठा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींनी या मार्गिकेसाठी श्रमदान करणाऱ्या इंजिनिअर्स आणि कामगारांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केली आहे. ठाणे-दिवा दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गिकेचे अनावरण झाल्याने अभिनंदन करतो. हा मार्ग मुंबईतील नागरिकांचे इज ऑफ लिविंग वाढवण्याबाबत मदत करेल. नवीन रेल्वे मार्गामुळे मुंबकरांचा प्रवास देखील आता वेगवान होणार आहे. या मार्गिकेचे चार फायदे होणार आहे. यामध्ये लोकल आणि एसटी स्टँडला वेगळी लाईन असेल. तसेच दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्या ट्रेनला लोकल पास होण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनलवरुन कोणथ्याही अडथळ्याशिवाय रेल्वे धावतील.

- Advertisement -

नव्या मार्गिकेमुळे कलवा, दिवा येथील प्रवाशांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. नव्या मार्गिकेच्या लोकार्पणामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून ३६ फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये काही फेऱ्या या एसी ट्रेनच्या असतील. तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरवण्यात येत आहे. मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या लोकलचा विस्तार करण्याची मागणी करण्यात येत होती.

विरोधकांवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले की, ठाणे-दिवा मधील नव्या मार्गिकांचे 2008 मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. 2015 मध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे होते परंतु 2014 पर्यंत हा प्रकल्प वेगवेगळ्या कारणामुळे प्रलंबित होता. आमचे सरकार आल्यानंतर कामाला वेग आला. अनेक अडचणी सोडवून मार्ग तयार केला आहे. मुंबईत अनेक पूल बांधण्यात आले अनेक बोगदे तयार करण्यात आले असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Thane-Diva Railway : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला ठाणे – दिवा लोकल प्रवास

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -