शिवसेनेच्या खासदाराच्या उद्घाटनप्रपंचाने छगन भूजबळ नाराज

शिवसेनेच्या खासदाराच्या उद्घाटनप्रपंचाने छगन भूजबळ नाराज

शिवसेनेच्या खासदाराच्या उद्घाटनप्रपंचाने छगन भूजबळ नाराज

नाशिक शहरातील सध्याच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर अतिरिक्त पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचं उद्घाटन शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी कोणालाच न सांगता करुन टाकलं. त्यांच्या उद्घाटनप्रपंचाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालकमंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. उद्घाटन करताना तिथे केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी असायला हवेत, असं छगन भुजबळ म्हणाले.

हेमंत गोडसे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याला न बोलवता स्वत:च उड्डाणपुलाचं उद्घाटन करुन टाकलं. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी वाट न पाहता उद्घाटन करुन टाकलं. यावेळी त्यांनी जोरदार फोटोसेशन देखील केलं. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी बोलताना या उड्डाणपुलाचं अधिकृतरित्या उद्घाटन नितीन गडकरी ऑनलाईन पद्धतीने करणार असल्याचं सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यांवर खड्डे आहेत. लोकांच्या सुविधेसाठी उद्घाटन केलं, असं देखील गोडसे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे या पुलाची उभारणी नुकतीच पूर्ण झाली. फित कापून उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतुकीसाठी उड्डाणपुल खुला केल्यामुळे शहरवासियांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असं देखील हेमंत गोडसे म्हणाले.

 

First Published on: August 10, 2021 9:02 AM
Exit mobile version