Nashik Oxygen Tank Gas leakage : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, त्रिसदस्यीय समितीकडून घटनेची चौकशी

Nashik Oxygen Tank Gas leakage : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, त्रिसदस्यीय समितीकडून घटनेची चौकशी

'बाळासाहेब म्हणाले, सेना सोडली नसती तर मुख्यमंत्री....'

नाशिकमध्ये महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी लिकेज झाल्यामुळे २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुपारी १२.३० च्या सुमारास रुग्णालयातील ऑक्सिजन टाकी लिकेज झाली, या टाकीतील ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयातील गंभीर असलेल्या रुग्णांना पुरवण्यात येत होता. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेले काही रुग्ण ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्यामुळे दगावले आहेत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घटनास्थळी पोहचून रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या घटनेची डॉक्टर, इंजिनियर, आयएस अधिकारी अशा त्रिसदस्यीय समितीकडून घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचे नाशिकचे पालकमंत्री आणि अल्पसंख्यांक मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

रुग्णालयाचा आढावा घेतल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली, भुबळ यांनी म्हटले आहे की, रुग्णालयातील ऑक्सिजन टाकी लिकेज झाल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कंपनीचे लोक घटनास्थळी दाखल झाले, पाऊणतासाच्या प्रयत्नानंतर ऑक्सिजनची पुन्हा जोडणी करण्यात आली आहे. तोपर्यंत इतर रुग्णालय आणि भुजबळ कोविड सेंटरमधून ऑक्सिजनचे सिलेंडर पाठवण्यात आले होते. ऑक्सिजन दुरुस्ती करेपर्यंत काही रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये २२ लोकांचा मृत्यू झाला असून यात ११ पुरुषांचा आणि ११ महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते त्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ऑक्सिजनवर असलेल्या ११ रुग्णांचा असा २२ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

रुग्णालयातील ५ रुग्णांपैकी ४ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १ रुग्ण खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. रजेवर असलेल्या डॉक्टरांनाही बोलावण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णाजवळ १ डॉक्टर ठेवण्यात आला आहे. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमध्ये १ आयएस अधिकारी, १ इंजिनियर आणि १ डॉक्टरचा समावेश असणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

First Published on: April 21, 2021 4:25 PM
Exit mobile version