फळ प्रक्रियायुक्त मालाची निर्यात; नाशिक राज्यात अव्वल

फळ प्रक्रियायुक्त मालाची निर्यात; नाशिक राज्यात अव्वल

प्रातिनिधीक फोटो

नीलेश बोरा, लासलगाव

फळ प्रक्रियायुक्त माल निर्यातीतून देशाला २०१८-१९ मध्ये ४४७६ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा वाटा पाचशे कोटींचा असून महाराष्ट्रातून नाशिक अव्वलस्थानी आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात दर वर्षी फळे निर्यात होतात. फळ निर्यातीबरोबर फळांवर प्रक्रिया करून तो पक्का माल निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या पश्चिम भारतातल्या चार राज्यांमध्ये फळांचे एवढे उत्पादन होऊ शकते की, सार्‍या जगाला ही उत्पादने पुरवू शकतो. विशेषत: महाराष्ट्रामध्ये फळांच्या उत्पादनाची क्षमता अफलातून आहे. राज्यातून नाशिक जिल्ल्ह्यातून पाचशे कोटींची निर्यात झाली असून राज्यातून निर्यातीमध्ये नाशिक वरच्या क्रंमाकावर आहे. द्राक्ष, डाळिंब, बोर, केळी, पेरू, नारळ, आंबा, चिकू ही फळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादनात होत असल्याने यावर प्रक्रिया करुन ५ लाख ९० हजार मेट्रिक टन प्रक्रिया केलेले फळ आणि ज्यूस निर्यात करुन ४४७५.५० कोटींचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये निर्यातीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नेदरलॅण्ड, सौदी अरब, यूनाईट स्टेट, ए युके, रशिया, चायना, इराण, फ्रान्स, जपान आदी देशात निर्यात होते. दरवर्षी भारतातून प्रक्रिया फळे आणि ज्यूस यांची युरोपीय संघ आणि इतर देशांत निर्यात वाढत आहे. २०१६-१७ मध्ये ३९०५ कोटींची निर्यात २०१८-१९ मध्ये ४४७६ कोटींवर गेली असून दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे.

निर्यात आलेख

२०१६-१७ – ५.३३ लाख मेट्रिक टन – ३,९०५ कोटी
२०१७-१८ – ५.७१ लाख मेट्रिक टन – ४,१६५ कोटी
२०१६-१७ – ५.९० लाख मेट्रिक टन – ४,४७६ कोटी

शासनाने लक्ष द्यावे

प्रक्रिया उद्योगांमधून भारताची उलाढाल वाढली आहे. मात्र, दुसरीकडे जेटने विमानसेवा बंद केल्याने इतर विमान कंपन्यांनी निर्यातीचे दर १५ टक्क्यांनी वाढवले आहेत. याचा फटका वाहतूक खर्चाला बसला आहे. यामुळे निर्यातीला फटका बसणार आहे. याकडेही शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. – विलास शिंदे, सह्याद्री एक्सपोर्ट, नाशिक

First Published on: May 18, 2019 11:59 PM
Exit mobile version