कोरोनानंतर फाळके स्मारकाच्या विकासाला प्राधान्य; आयुक्त जाधवांची ग्वाही

कोरोनानंतर फाळके स्मारकाच्या विकासाला प्राधान्य; आयुक्त  जाधवांची ग्वाही

कोरोनाच्या संकटानंतर फाळके स्मारकाच्या विकासाचा प्रकल्प प्राधान्यानं हाती घेण्याची ग्वाही नवनियुक्त पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. फाळके स्मारकासह बौद्ध स्मारक आणि सेंट्रल पार्क परिसराची आज त्यांनी पाहणी केली. यावेळी फाळके स्मारकासह बौद्ध स्मारक आणि सेंट्रल पार्कची तातडीने स्वच्छता करण्याची सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केली. बौद्ध स्मारक, बुद्ध विहार, प्रदर्शन हॉल, परिसरातील संगीत कारंजे, मिनी थिएटर परिसरातलं उद्यान, कार्यक्रमासाठी बनवलेलं व्यासपीठ, दादासाहेब फाळके हॉल, डॉक्युमेंटरी हॉल, वॉटर पार्क, पार्किंग याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या त्याठिकाणी प्रवेशद्वाराची पाहणी आयुक्तांनी केली. नगरसेवक दीपक दातीर यांनी शिष्टमंडळासह पुतळा परिसराचं सुशोभीकरण करण्याची मागणी केली.

First Published on: September 30, 2020 6:55 PM
Exit mobile version