मिरझापूरला अडवलेले द्राक्षट्रक रवाना

मिरझापूरला अडवलेले द्राक्षट्रक रवाना

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू झाल्यामुळे मिरझापूर (उत्तर प्रदेश) येथे दोन दिवसांपासून अडकलेले द्राक्ष कंटेनर सोडण्यात आले आहेत. दिंडोरीच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी मोरझापूर येथील पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत हे कंटनेर सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
द्राक्ष बाग काढनीचा हंगाम जोरात सुरु असताना कलम 144, संचारबंदी लागली झाल्याने बाहेरच्या राज्यांच्या तसेच जिल्हासीमा बंद झाल्या आहेत. द्राक्ष व्यापार्‍यांनी पाठवलेले कंटेनर हे मिरझापुर येथील रस्त्यावर अडवून धरले होते. खासदार डॉ. पवार यांच्याशी व्यापार्‍यांची चर्चा झाल्यानंतर तत्काळ पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून सोडण्याचे आदेश दिले. तसेच शेतकरी व व्यापारी यांनी हवालदिल होऊ नये. घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन केले.

First Published on: March 24, 2020 5:44 PM
Exit mobile version