दहावी- बारावी पुरवणी परिक्षा १७ जुलैपासून

दहावी- बारावी पुरवणी परिक्षा १७ जुलैपासून

९वी ते १२वी मूल्यांकनाचा होणार पुनर्विचार

इयत्ता दहावी, बारावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी १७ जूलैपासून घेण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान, तर बारावीची परिक्षा १७ जूलै ते ३ ऑगस्ट दाम्यान घेण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेसाठी जिल्ह्यातून ५९ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थांना विलंब शुल्कासह अर्ज करण्याची संधी संपली असली तरी विद्यार्थ्यांना अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

पुरवणी परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यात नियमित अंतिम मुदत २४ जून व विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत २७ जूनला संपुष्टात आली असून, अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत सोमवारी (दि. १) संपली आहे. आता विद्यार्थ्यांना विशेष अतिविलंब शुल्कासह ८ ते १२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिदिन १०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार असून, त्यानंतरही अतिविशेष अतिविलंब शुल्कासह थेट परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासाठी प्रतिदिन २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत.

First Published on: July 3, 2019 4:59 PM
Exit mobile version