शहरात अवघे ११५ कोरोनाबाधित

शहरात अवघे  ११५ कोरोनाबाधित

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना नाशिक शहरातही रुग्णसंख्या घटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी दिवसभरात शहरात अवघे ११५ नवे कोरोनाबाधित आढळून आले. मात्र, जिल्ह्यात २६८ रुग्ण आढळून आले. ६८० रुग्ण बुधवारी कोरोनामुक्त झाले. रुग्णसंख्या घटत असली तरी वाढत्या मृत्युदराचे आव्हान प्रशासनासमोर कायम असल्याचे दिसते. बुधवारी तब्बल ७२ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गामुळे दुसर्‍या लाटेत नाशिक शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. एप्रिल, मे महिन्यात दररोज आढळून येणार्‍या रुग्णांची संख्या साडेसहा हजारांवर जाऊन पोहचली. मात्र, आता ही लाट ओसरत असून शहरात रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रुग्णसंख्या घटत असताना दुसरीकडे वाढते मृत्यू आणि म्युकरमायकोसिस हे एक नवे आव्हान प्रशासनाला आता पेलायचे आहे. मंगळवारी ५७ रुग्णांचा मृत्यू झाला तर बुधवारी ७२ मृत्यू झाल्याची नोंद थक्क करणारी आहे. यात नाशिक शहरात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला तर ग्रामीण भागातील २३ तर मालेगाव शहरातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ७९ हजार २१२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ५ हजार २६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आज शहरात ११५ तर ग्रामीणमध्ये मात्र त्याच्या दुपटीने रुग्णसंख्या दिसते. म्हणजेच २४८ रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्यादेखील धक्कादायक आहे. बुधवारी नाशिक शहरात ४५, तर ग्रामीणमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडणार्‍यांचा बुधवारचा आकडा थक्क करणारा आहे.

बरे होण्याची प्रमाण ९७ टक्के

मृतांचा आकडा पाच हजारांपार

नाशिक ग्रामीण २ हजार ४४८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार १६४, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ३१९ व जिल्हाबाहेरील १०० अशा एकूण ५ हजार ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात बुधवारच्या ७२ मृत्यूंनंतर आता हा आकडा ५ हजार १०३ पर्यंत पोहोचला आहे.

सद्यस्थिती

तालुक्यांतील कोरोना स्थिती अशी..

First Published on: June 10, 2021 2:23 PM
Exit mobile version