नाशिक जिल्ह्यात 14 हजार ’होम क्वारंटाईन’

नाशिक जिल्ह्यात 14 हजार ’होम क्वारंटाईन’

नाशिक : जिल्ह्यात अद्याप करोना रुग्ण आढळून आलेला नसला तरी मुंबई, पुण्यासह इतर शहरांचे नागरीक ग्रामीण भागात स्थलांतरीत झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात 14 हजार ’होम क्वारंटाईन’ आढळले आहेत. आरोग्य विभागाला त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठिण झाले असून एकट्या सिन्नर तालुक्यात दोन हजारांवर ’होम क्वारंटाईन’ असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मटन, माश्यांचे भाव वधारले
मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून गावात दाखल झालेल्या नागरीकांनी आता एन्जॉय करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मटन, मासे व मद्याचे भावही वधारल्याचे समजते. दिवसभर आराम करायचा आणि सायंकाळी नॉन व्हेजवर ताव माराण्याचा बेत आता आखला जात आहे.
..प्रतिक्रिया
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरीक दाखल झाले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात नागरीकांवर उपचार कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक तालुक्यात साधारणत: सातशे ते साडेसातशे लोक बाहेरुन आले आहेत.
-डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

First Published on: March 28, 2020 6:33 PM
Exit mobile version