18 व्यावसायिकांवर कारवाई

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदेश पारित केले आहेत. तरीही भद्रकालीत 18 व्यवसायिकांनी आदेशाचे उल्लंघन दुकाने चालू ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या सर्वांवर भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी कारवाई केली आहे.
करोना आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी 144 कलम लागू केले आहे. रविवारी जनता कर्फ्युला भद्रकाली परिसरातील व्यवासायिकांनी प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी 18 व्यवसायिकांनी आदेशाचे उल्लंघन करत दुकाने चालू ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ते अत्यावश्यक सेवा देत नसल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी 18 व्यवसायिकांवर कारवाई केली.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये
नाशिक शहर व जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे.

First Published on: March 23, 2020 6:13 PM
Exit mobile version