नाशिकमध्ये १८; दिंडोरीत ८ उमेदवार

नाशिकमध्ये १८; दिंडोरीत ८ उमेदवार

प्रातिनिधीक फोटो

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.१२) माघारीच्या अंतिम मुदतीत नाशिकमधून पाच तर दिंडोरीतून एका उमेदवाराने माघार घेतल्याने आता नाशिकमधून १८ तर दिंडोरीतून ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नाशिक मतदारसंघासाठी ३० उमेदवारांचे ४१ अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीनंतर २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आज माघारीच्या मुदतीत नाशिकमधून सिमंतीनी कोकाटे, करण गायकर, रमेश भाग्यवंत, राजू कटाळे, महेश आव्हाड यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नाशिकमधून १८ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार आणि अपक्ष अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. दिंडोरी मतदारसंघात १५ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले होते. यात ६ उमेदवारांनी माघार घेतल्याने ९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अपक्ष हेमराज वाघ यांनी माघार घेतल्याने आता ८ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार, राष्ट्रवादीचे धनराज महाले, माकपचे जीवा पांडू गावित यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

First Published on: April 12, 2019 11:30 PM
Exit mobile version