कोषागार विभागात 201 कोटींची बिले सादर

कोषागार विभागात 201 कोटींची बिले सादर

नाशिक : मार्च अखेरीस जिल्हा कोषागारातून ३१ मार्चला सायंकाळपर्यंत २०१ कोटी ४१ लाख ६० हजार ३६३ रूपयांची ५८१ बिले सादर झाली. रात्री उशिरापर्ययत विविध शासकीय विभागांकडून कोशागार विभागात बिले सादर करणे सुरू होते.

जिल्ह्यात सरकारी कार्यालयांकडून जिल्हयाच्या मुख्य लेखा व कोषागारात विविध खर्चांची बिले सादर करण्यासाठी लगबग सुरू होती. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुख्य व तालूकास्तरावरील उप लेखा व कोशागार शाखेत विविध शासकीय विभागांची ५८१ बिले सादर करण्यात आली.यात विकास कामांसह, कार्यालयीन खर्च तसेच कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय बिलांचा समावेश होता.दुपारी चारपर्यंत ५७ कोटी ९३ लाख ७२ हजार ९५७ रूपये रक्कमेची ४६६ बिले मंजूर करण्यात आली.

लेखा व कोषागार विभागाने १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च सकाळपर्यंत एकुण ८५ हजार ४६१ बिले ही मंजूर करून त्याची रक्कम शासकीय विभागांना वितरीत करण्यात आली. वितरीत केलेली रक्कम ही १० हजार ३१५ कोटी ९० लाख ३८ हजार २२ इतकी आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी गुरूवारी रात्री १२ पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरीसह तालूकास्तरावरील मुख्य शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे मार्च एन्डला शासकीय कार्यालयांची बिले सादर करण्यासाठी होणारी धावपळ काहीअंक्षी कमी झाली.

First Published on: April 1, 2022 8:20 AM
Exit mobile version