२१ वर्षीय तरुणी बनली करंजुलची कारभारीण

२१ वर्षीय तरुणी बनली करंजुलची कारभारीण

२१ वर्षीय तरुणी बनली करंजुलची कारभारीण

‘जिच्या हाती पाळणाची दोरी ती जगाचे उद्धारी’. एक पुरुष शिकला तर एकटा शहाणा होतो. मात्र, एक स्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते. अशीच एक गुजरात सिमेवरील अतिदुर्गम भागातील जेमतेम तीनशे लोकवस्तीचे गाव करंजुल (सु). रंजना चिंतामण वार्डे वय अवघे २१ वर्षे हिच्या ध्यानीमनीही नसताना निवडणुकीत वरमाला आधीच गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. यामुळे करंजुल (क) ग्रामपंचायतीच्या कारभारासह गांडोळमाळ, वडमाळ, बोरीचागावठा येथील गावगाडा हाकण्याची जबाबदारी नवनिर्वाचित सरपंच रंजना हिच्याकडे आली आहे.

तिच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. वडील शेतमजूर, अल्पशिक्षित तर आई मजूरी व घरकाम करणारी. घरात राजकारणाचे वातावरणही नाही. रंजनाने गतवर्षीच सुरगाणा येथील नुतन विद्यामंदिर येथून बारावीचे शिक्षण घेतले असून बी. ए प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. तिला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे. अशिक्षित आदिवासी महिलांना आरोग्य, शिक्षण, बँक व्यवहार, बचतगटांना मदत करणे कामाची आवड आहे. महिलांशी सतत संपर्कात राहून तिला हे यश मिळाले आहे. याबद्दल ग्रामस्थांनी तिचा सत्कार केला आहे. निवडणूक प्रकियेकामी निवडणूक अधिकारी वि. टी. शिंदे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत, विस्तार अधिकारी के. के. गायकवाड आदींनी काम पाहिले. सत्कारप्रसंगी भागवत राठोड, बबन पवार, परशराम लहरे, बाळू लहरे, जयराम वार्डे, रमेश वार्डे, लक्ष्मण राठोड, यादव भोये, विजय राठोड, भास्कर लहरे, सुरेश वार्डे, धवळू लहरे, मधू पवार, संजू पवार, उपस्थित होते.

First Published on: June 28, 2019 10:50 PM
Exit mobile version