नागरीकांसाठी 24 तास तक्रार निवारण मंच

नागरीकांसाठी 24 तास तक्रार निवारण मंच

नाशिक : लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन काही दुकानदार जीवनावश्यक वस्तू वाढीव दराने विकत असल्याचे उघडकीस आले आहे. त्र्यंबकेश्वरइगतपुरी मतदारसंघातील नागरीकांना काही अडचणी असल्यास त्यांच्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी 24 तास तक्रार निवारण मंच सुरु केला आहे. तसेच आरोग्य सेवा तत्काळ सुधारण्यासाठी 50 लाख रुपये दिले आहेत. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधांची वाणवा जाणवते. नवीन वैद्यकीय उपकरणे, साधने व औषधे यांची मागणी होत आहे. ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा सोयी सुविधा नसल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक विकास कार्यक्रम 2019-20 2020-21 या निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी 50 लाख रुपये दिले आहेत. या निधीतून वैद्यकीय उपकरणे, साधणे व औषधे खरेदी केली जाणार आहेत.

येथे करा संपर्क

मतदारसंघातील नागरीकांसाठी 24 तास तक्रार निवारण मंच स्थापन केला आहे. त्यावर नागरीकांनी संपर्क करुन आपल्या अडचणी मांडाव्यात असे आवाहन खोसकर यांनी केले आहे. वामन खोसकर-9673162577, अनुप वनसे-9595267194, रोशन चारोस्कर-9527375826, महेश भोई-7798820642 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

First Published on: April 3, 2020 7:07 PM
Exit mobile version