दीव, दमणवरुन महाराष्ट्रात विक्रीस येणारा लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त; गुजरातच्या एकाला दुसर्‍यांदा अटक

दीव, दमणवरुन महाराष्ट्रात विक्रीस येणारा लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त; गुजरातच्या एकाला दुसर्‍यांदा अटक

दमण व दीव येथील दोन कारमधून लाखो रुपयांचा अवैध मद्यसासाठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिकच्या विभागीय भरारी पथकास मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने सोमवारी (दि.१९) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळ सापळा टाकत चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन कारसह ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बंदी असलेली व दादरा नगर हवेली निर्मित बेकायदा मद्य महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने सोमवारी रात्री सापळा रचला. पथकाने दोन संशयित कारची तपासणी केली असता कारमध्ये अवैध मद्यसाठा आढळून आला. पथकाने दोन कारमधील चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपुर्वीच १४ ऑक्टोबर रोजी पथकाने दीपक पटेल याला स्कार्पिओच्या चोरकप्प्यात मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी हरसूल पेठ रोडवरील धानपाडा शिवारात अटक केली होती. तो जामिनावर बाहेर आला होता. त्याला दुसर्‍यांदा अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ‘एक्साईज’कडून एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

आठ दिवसांत तिसरी कारवाई

केंद्रशासित प्रदेशनिर्मित मद्याची अवैध वाहतूक नाशिक जिल्ह्यातून केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. महाराष्ट्रात बंदी असलेली व दादरा नगर हवेली निर्मित बेकायदा मद्याची वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागास यश आले आहे. आठ दिवसात भरारी पथकाने तिसरी कारवाई केली आहे. पहिली कारवाई बुधवार, दि.१४ ऑक्टोबर रोजी रात्री स्कार्पिओच्या चोर कप्यात मद्याची वाहतूक करणार्‍या गुजरातमधील दोघांना पथकाने हरसूल पेठ रोडवरील धानपाडा शिवारात अटक केली. त्याच्याकडून पथकाने स्कार्पिंओसह सव्वाबारा लाखांची दारू जप्त केली. गुरुवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दिंडोरी भरारी पथकाने पेठ ते नाशिक रोडवरील सावळघाट इनामबारी शिवारात सापळा रचून कारचालकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून कारसह चार लाख ४ हजार ६४० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. सोमवार, दि.१९ ऑक्टोबर रोजी विभागीय भरारी पथकाने हरसूलजवळ दोन कारमधून चौघांना अटक करत ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

First Published on: October 19, 2020 3:28 PM
Exit mobile version